एक संकटाचा खडा

Pravin Thakur
0
एका इमारतीचे बांधकाम चालू होते.
अकराव्या मजल्यावर इंजीनियर होता.
खाली कामगार काम करत होता.
इंजिनियरला त्या कामगाराला कायतरी सांगायचे होते
परंतु त्याचा आवाज कामगारापर्यंत पोहोचत नव्हता.
आता काय करायचे?
त्या कामगाराला सुचना कशा करायच्या?
याचा विचार करत होता.

इंजीनियर आपल्या खिशात हात घालतो एक रुपयांचा नाणे खाली फेकतो,
त्याला वाटते ते एक रूपयाच नाण पाहून कामगार वर पाहील पण तसे काही होत नाही.

कामगार ते पडलेलेे एक रूपयाच नाणं खिशात घालतो व आपले काम सुरू ठेवतो.

इंजीनियर परत इकडे तिकडे पाहतो परत पाच रूपयाच नाणं खाली टाकतो
आतातरी कामगार वर पाहील असं त्या इंजीनियरला वाटते पण तसं काही होता नाही

पण तो कामगार वर काही पाहत नाही, परत कामगार ते पाच रूपयाच नाणंही खिशात घालतो आणि आपले काम सुरू ठेवतो

आता इंजीनियर कामगाराच्या दिशेने वरून एक खडा टाकतो.

आता मात्र कामगार खडा़ कोणी टाकला म्हणून लगेच वर बघतो
असेच काही माणसाचे झाले आहे

देव माणसाला नोकरी देतो 
ज्यावेळी त्याला पैसा देतो त्यावेळी त्याचे लक्ष देवाकडे जात नाही.
देव माणसाला प्रमोशन देतो अधिक पैसा देतो तरीही माणसाचे लक्ष देवाकडे जात नाही 

मग देव माणसाच्या जीवनात एक संकटाचा खडा टाकतो 
मग मात्र माणसाचे लक्ष देवाकडे जातं 
मग माणूस देवाकडे हात जोडतो 

तर  योग्य वेळीच आपण जर देवाकडे हात जोडले तर देव आपले लक्ष वेधण्यासाठी आपल्या आयुष्यात खडा टाकणार नाही

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)